माझ्या आवडत्या कविता


माझ्या आवडत्या कविता || ००१ -- मन वढाय वढाय - बहीणाबाई




मन वढाय वढाय
उभ्या पिकातल ढोर
किती हाकलं हाकलं
फिरी येतं पिकावर 

मन पाखर पाखर
तयाची काय सांगू मात
आता वहत भुइवर
गेल गेल आभायात

मन लहरी लहरी
तयाले हाती धरे कोन
उंडारल उंडारल
जस वारा वाहादन

मन जहरी जहरी
याच नयार रे तनतर
आरे इचू साप बरा
तयाले उतारे मनतर

मन एव्हड एव्हड
जस खसखसच दान
मन केवढ केवढ
आभायतिब मावेन

देवा आस कस मन
आस कस रे घडल
कुठे जागेपनी तुले
अस सपन पडल

No comments:

Post a Comment