संतवाणी


संतवाणी -- ००१ || संत सावतामाळी !! --१




कांदा मुळा भाजी
अवघी विठाई माझी || धृ. ||

लसूण मिरची कोथिंबिरी
अवघा झाला माझा हरी || १ ||

ऊस गाजर रताळू
अवघा झालासे गोपाळू || २ ||

सावता म्हणे केला मळा
विठ्ठलापायी गोविला गळा || ३ ||